Last Updated: Friday, March 2, 2012, 10:55
आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी विश्रांती देण्याची विनंती मीच निवड समिती आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली होती, अशी माहिती सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने गुरुवारी दिली. बीसीसीआयचे न ऐकल्याने भारतीय संघातून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सेहवागने ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बांगलादेश दौऱ्यासाठी संघात पुनरागमन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.