`द लंचबॉक्स`ची अमेरिकेत रेकॉर्डब्रेक कमाई

Last Updated: Monday, May 12, 2014, 18:02

भारतीय सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले, बाजारात प्रोड्यूसरची कमाई चांगलीच होते. पण परदेशात देखील भारतीय सिनेमांना मोठं बाजार खुलं आहे.

श्रद्धा आणि सिद्धार्थचा पाण्याखाली रोमान्स

Last Updated: Thursday, May 8, 2014, 18:55

श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र सिनेमा करत आहेत. येणाऱ्या काहीच दिवसात `एक विलेन` या सिनेमात हे दोघे झळकणार आहेत. या सिनेमाच्या एका गाण्यासाठी श्रद्धा आणि सिद्धार्थने स्कूबा डायविंग केली. आहे. श्रद्धा ही एक चांगली डायवर आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रापण एक चांगला डायवर होण्याचा प्रयत्न करत आहे.

`२ स्टेट्स`ची पहिली कमाई १२ करोड

Last Updated: Monday, April 21, 2014, 16:54

पहिल्याच दिवशी १२ करोडची मोठी ओपनिंग करत, `२ स्टेट्स` या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूम उडवून दिली आहे.

सनीच्या `रागिनी MMS-२`नं केली २४.५ कोटींची कमाई!

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 10:45

नुकतंच अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थीनीनं सनी लिऑनच्या गाण्यावर वाईट पद्धतीनं नाचून व्हिडिओ बनवला. तिनं नुसता व्हिडिओ बनवलाच नाही तर तो व्हिडिओ यूट्युबवर प्रसिद्ध केलाय. त्याला चांगल्या हिट्सही मिळातायेत. कारण लहान बजेट असलेला चित्रपट `रागिनी एमएमएस २` बॉक्स ऑफिसवर चांगला चालतोय. आतापर्यंत चित्रपटानं २४.५ कोटींची कमाई केलीय.

`क्वीन` बॉक्स ऑफिसची राणी, आतापर्यंत २१ कोटींची कमाई!

Last Updated: Monday, March 17, 2014, 12:45

कंगना राणावतच्या `क्वीन` चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २१ कोटी रुपयांची कमाई केलीय. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या `बेवकुफियाँ`लाही मागे टाकलंय. आयुष्मान खुरानाच्या बेवकुफियाँनं ४.७४ कोटी रुपयांची कमाई केलीय.

क्रोम, मोजिला फायरबॉक्स वापरताय... सावधान!

Last Updated: Sunday, February 16, 2014, 19:48

गुगलचे वेब ब्राऊजर्स `गुगल क्रोम` आणि `मोजिला फायरफॉक्स` यूजर्समध्ये लोकप्रिय झालेत. पण, हेच वेब ब्राऊजर्स तुम्हाला धोका देऊ शकतात.

`जय हो`पडला `एक था टायगर`पेक्षा कमी

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:52

सलमान खानचा अॅक्शन पॅक्ड चित्रपट `जय हो` रिलीज होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत. मात्र फॅन्ची अपेक्षा जय हो पूर्ण करू शकत नाहीय. `जय हो`ची पहिल्या दिवसाची कमाई ही सलमानच्याच `एक था टायगर`च्या पहिल्या दिवसाच्या कमाई पेक्षाही कमी झालीय. `जय हो` हा रेकॉर्ड तोडू शकलेला नाही.

महिलांनो सावधान... गोरं करणाऱ्या क्रीममध्ये विषारी धातू

Last Updated: Thursday, January 16, 2014, 16:09

सध्या बाजारात अशा अनेक सौंदर्य क्रीम आहेत की ज्या लवकरात लवकर गोरं बनविण्याचा दावा करतात. मात्र अशा क्रीममुळं आपल्याला त्वचेचे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळं महिलांनो सावध राहा...

२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!

Last Updated: Monday, January 13, 2014, 10:29

बॉलिवूडमधल्या खानच्या सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. या नवीन वर्षात बॉलीवूडच्या खान मंडळीचे एकूण ८ सिनेमे थिएटरवर धडकणार आहेत. खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर झळकणार म्हणजे इतर हिरोंच्या सिनेमांना टशनच म्हणावी लागेल.

आमीरची धूम जोरात ३०० कोटी पार, ४००च्या जवळ

Last Updated: Friday, January 3, 2014, 20:58

बॉलिवूडमधील आजपर्यंत सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून चर्चेत असलेला धूम-३ने बॉक्स ऑफिसवरील कमाईमध्ये आतापर्यंत सर्व चित्रपटाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. धूम-३ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता हा चित्रपट ४०० कोटीच्या कमाईसाठी झपाट्याने पुढे पाऊल टाकतो आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट ४०० कोटी पेक्षा जास्तीची कमाई करण्याची शक्यता आहे.

आमिरच्या ‘धूम’नं शाहरुखच्या ‘एक्स्प्रेस’ला टाकलं मागे

Last Updated: Saturday, December 21, 2013, 14:24

यश राज फिल्म्सचा बहुचर्चित धूम सिरीजमधला तिसरा सिनेमा ‘धूम ३’ या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकला. या सिनेमाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चांगलं ओपनिंग मिळालंय.

सलमानचा 'जय हो' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated: Sunday, December 15, 2013, 07:45

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला "जय हो" या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दबंग खान सलमाननं खास आपल्या शैलीत या फिल्मच्या प्रमोशनची सुरुवात केली.

बिग 'बॉक्स’मध्ये कामया आणि संग्रामचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड

Last Updated: Friday, December 13, 2013, 20:28

‘बिग बॉस ७’ सीजनमध्ये आता स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. सर्व स्पर्धक आपले टास्क लवकरात लवकर कसे पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. या सर्व स्पर्धकांमध्ये कामया आणि संग्रामनं आता आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडला आहे. बिग बॉसच्या घरा कामया आणि संग्राम हे दोघं टास्क अतिशय योग्यरितीनं पूर्ण करताना दिसत आहे. बिग बॉसनं दिलेलं प्रत्येक कार्य त्यांनी खंबीरपणे पूर्ण केलंय.

वानखेडेच्या पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 19:10

वानखेडे स्टेडिअममधील पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झल्यानंतर आज त्याचा नामकरण सोहळा संपन्न झालाय.

क्रिश ३ चा बॉक्स ऑफिसवर पराक्रम

Last Updated: Sunday, November 3, 2013, 19:39

दिवाळीच्या मुहुर्तावर साधारणतः शाहरुख खानचे सिनेमे प्रदर्शित होऊन रेकॉर्डब्रेक कमाई करतात. पण यंदा तो मुहुर्त हृतिक रोशनने साधला आहे. `क्रिश ३` या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

विल्सन कॉलेजमध्ये बसतात प्रॉक्सी प्राचार्य!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:40

चर्नी रोड इथल्या विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापकांसोबतच गैरव्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. कॉलेजमध्ये चक्क प्रॉक्सी प्राचार्य बसतात आणि याचा प्राध्यापकांना मोठा जाच होतोय.

`दुनियादारी`ने केला २५ कोटींचा आकडा पार

Last Updated: Thursday, October 3, 2013, 18:21

मराठी चित्रपटांच्या 80 वर्षांच्या इतिहासात 25 कोटींचा आकडा पार करणारा ‘दुनियादारी’ हा पहिलाच सिनेमा ठरलाय.

बॉक्सिंग जगज्जेतीलाही झालाय वासनांधाचा त्रास!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 16:05

बॉक्सिंगची जगज्जेती! तेही पाचवेळा. तिच्या वाटयाला कोण जाईल? तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोण करणार? जो कोणी हे धाडस करेल त्याची काही खैर नाही. असं आपल्या वाटत असेल पण नाही, पाचवेळची जगज्जेती बॉक्सर मेरी कोमला विश्वविजेती होण्याआधी सुरुवातीच्या दिवसात असा वाईट अनुभव आला आहे.

‘द लंचबॉक्स’ कलेच्या जाणकार दर्शकांसाठी- बिग बी

Last Updated: Monday, September 23, 2013, 15:02

महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाची प्रशंसा केलीयं. ते म्हणतात,’हा चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांसाठी आहे.

... या `लंच बॉक्स`ची एकदा चव चाखायलाच हवी!

Last Updated: Saturday, September 21, 2013, 19:51

खऱ्या अर्थानं ‘अडल्ट मुव्ही’ (वल्गर नाही) म्हणजेच ‘मॅच्युअर’ म्हणावा असा हा चित्रपट... मुंबईच्या भाऊगर्दीत एका सरकारी कार्यालयातील अकाऊन्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारा (साजन फर्नांडीस) आणि एक कर्तव्यदक्ष गृहिणी ईला (निर्मत कौर) यांचा काहीही संबंध नसताना अचानक जुळून आलेला संवाद...

अत्याचार होतोय, तक्रार पेटीत टाका!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:22

मुंबई आणि दिल्लीसह नागपूर सारख्या शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताहेत. पीडितांमध्ये शाळांमधल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक आहे. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक कौतुकास्पद युक्ती लढवलीय.

किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने धोक्याचा इशारा

Last Updated: Thursday, August 29, 2013, 16:24

जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.

मला माझा मृत्यू दिसलाय – टायसन

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 08:47

खलनायक ठरलेला माजी मुष्टियोद्धा माईक टायसन एका वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. त्यांने आपले मरण पाहिले आहे. मला माझा मृत्यू दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे. हा मृत्यू दारू आणि अमली पदार्थामुळे जवळ आल्याचे त्यांने नमुद केले आहे.

बॉलिवूडचे करण-अर्जुन आमनेसामने!

Last Updated: Monday, August 26, 2013, 17:18

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला किंग खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चांगलाच हीट ठरला. त्यामुळं पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर शाहरुख विरुद्ध सलमान असा सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

`ऑक्सफर्ड`ची नवी रीत, नियम मोडून शब्दकोशात `ट्विट`

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 18:08

सोशल नेटवर्किंग साइटवरील `ट्विट` हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आपला एक महत्वाचा नियमही मोडला आहे.

करिना-शाहिदनं एकमेकांना पुन्हा टाळलं!

Last Updated: Thursday, June 13, 2013, 09:56

शाहिद कपूर आणि करिना कपूर-खान या एक्स प्रेमी युगुलानं एकमेकांना धडक देण्याचं पुन्हा एकदा टाळलंय.

वानखेडे स्टेडियममधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 07:40

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे.

‘लंचबॉक्स’ला मिळाला कान्समध्ये पहिला पुरस्कार

Last Updated: Friday, May 24, 2013, 21:23

सिनेमा दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा पहिलाच सिनेमा ‘लंचबॉक्स’नं ६६ व्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात ‘क्रिटिक्स वीक व्युअर्स चॉईस अवॉर्ड’ पटकावलंय.

विजेंदरची `डोप टेस्ट` निगेटीव्ह...

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 16:58

ड्रग्स घेतल्याच्या आरोपावरून भारताचा बॉक्स विजेंदर सिंह याला मोठा दिलासा मिळालाय. विजेंदरची डोप टेस्ट ‘निगेटीव्ह’ आलीय.

अबब... सेट टॉप बॉक्सच्या किंमती वाढल्या

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 17:54

केबलधारकांसाठी सेट टॉप बॉक्स देशभरात अनिवार्य केल्यानंतर त्याच्या किमतीत गेल्या ८ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे.

सेट टॉप बॉक्सला मिळणार मुदत वाढ?

Last Updated: Monday, March 18, 2013, 08:09

सेट टॉप बॉक्स लावा, अन्यथा ३१ मार्चनंतर आपल्याला टिव्ही पाहता येणार नाही. काळा पडदा दिसेल, अशी आपल्याला टिव्हीवर सध्या एजाहितात पाहायला मिळत आहे. मात्र, सेट टॉप बॉक्सला मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज प्रकरणात विजेंदर सिंग अडचणीत!

Last Updated: Friday, March 8, 2013, 14:44

मोहालीमधील झिराकपरूरमधील एका फ्लॅटमध्ये तब्बल १३० कोटी रुपयांचे २६ किलो अंमली पदार्थ सापडले आहेत. हे अमली पदार्थ ज्या ठिकाणी सापडले त्या फ्लॅटच्या बाहेर विजेंदर सिंगच्या पत्नीची कार सापडली आहे तर आणखी एका कारमध्ये १० किलो अमली पदार्थ मिळाले आहेत.

`सीएएम` देणार ‘सेट टॉप बॉक्स’पासून मुक्ती...

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 12:01

हाँगकाँग मुख्यालयस्थित कंपनी ‘एसएमआयटी कॉर्पोरेशन’ लवकरच ‘पे चॅनल’ पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सशिवाय वापरता येईल अशी सुविधा घेऊन येणार आहे.

आता शुद्ध हवा मिळणार ‘डबाबंद’

Last Updated: Thursday, January 31, 2013, 11:52

ग्लोबल वार्मिंगची समस्या जगाला भेडसावत आहे. प्रदूषणाचा प्रश्न सर्वांनाच ग्रासतो आहे. आता तर चीनमध्ये शुद्ध हवा देण्याचा उपक्रम हाती घेतला गेला आहे.

'पांडेजीं'साठी वाजवली 'सन ऑफ सरदार'ने शिट्टी!

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 07:05

सलमान खान बॉक्स ऑफिसचा राजा असल्याचं ‘दबंग २’ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. ‘दबंग २’ ही या वर्षातील सर्वात शेवटची धमाकेदार हिट फिल्म ठरली आहे. ‘दबंग’च्या यशाने सललमान खानने सर्व टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. सलमानच्या वाढत्या चाहत्यांमध्ये अजय देवगणही आहे.

... आता भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनचं निलंबन

Last Updated: Friday, December 7, 2012, 12:57

इंटरनॅशनल अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए)नं गुरुवारी रात्री उशीरा भारतीय अमॅच्युअर बॉक्सिंग फेडरेशनच्या (आयएबीएफ) निलंबनाची घोषणा केलीय.

`सन ऑफ सरदार` १०० कोटींच्या घरात

Last Updated: Friday, November 30, 2012, 16:33

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सिनेमा `सन ऑफ सरदार` याने भारतीय सिनेमाघरात तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे.

अजय की शाहरुख... कुणी मारली बाजी?

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 21:05

बॉक्स ऑफीसवरही दिवाळी धमाका झाला तो शाहरुख खानच्या ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमांच्या रिलीजमुळे...

मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म

Last Updated: Thursday, October 4, 2012, 19:04

लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

प्रेयसीसाठी कायपण, स्वत: झाला गिफ्ट बॉक्समध्ये बंद

Last Updated: Saturday, September 1, 2012, 11:37

प्रेयसीसाठी कायपण असं म्हणत, एका प्रियकराने एक आगळं वेगळं गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्याच्या जीवावर बेतलं.

`एक था टायगर`चा गल्ला २१० कोटी

Last Updated: Monday, August 27, 2012, 23:31

सलमान खानचा `एक था टायगर` हा सिनेमा कमाईचे नवनवे रेकॉर्ड करतोच आहे.सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण झाले नसले तरीही या सिनेमाने २०० कोटींची कमाई केली आहे.

माझ्या मुलांनी बॉक्सर होऊ नये- मेरी कोम

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 13:49

सुपरमॉम मेरी कोमने लंडन ऑलिम्पिक-२०१२मध्ये ब्राँझ मेडल जिंकून भारातीय बॉक्सिंगला ग्लॅमर मिळवून दिले आहे. त्यामुळे भारतीयांचे लक्ष आता बॉक्सिंगसारख्या खेळाकडे वळले आहे. मेरी कोम ही बॉक्सर्सची प्रेरणा ठरली आहे. मात्र आपल्या मुलांनी आपल्यासारखं बॉक्सर होऊ नये, असं मत मेरी कोमने व्यक्त केलं.

बॉक्सर देवेंद्रो हरला, मात्र चांगलाच झुंजला

Last Updated: Thursday, August 9, 2012, 22:03

लंडन ऑलिम्पिकमधील भारताचं बॉक्सिंगमधील आव्हानही संपुष्टात आलेलं आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावं लागल्याने त्याचे आव्हानही संपुष्टात आले.

सुपर मॉम मेरी कोम पराभूत, ब्राँझ पदरात!

Last Updated: Thursday, August 9, 2012, 06:50

सुपर मॉम म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय बॉक्सर मेरी कोमला लंडन ऑलिम्पिकच्या ५१ वजनी किलो गटाच्या बॉक्सिंगमध्ये ब्रिटनच्या बॉक्सरकडून पराभव पत्करावा लागला आहे. नकोला अडम्स हिने मेरीला ११-६ अशा फरकाने पराभूत केले

Olympic - मेरी कोम सेमीत, पदक निश्चित

Last Updated: Monday, August 6, 2012, 19:20

भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला.

मेरी कॉमची क्वार्टर फायनमध्ये धडक

Last Updated: Sunday, August 5, 2012, 20:12

पाच वेळा विश्व चॅम्पियनचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कॉम हिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिलीय. लंडन ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग मॅचमध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कॉमनं विजय खेचत आणून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.

बॉक्‍सर देवेंद्रो सिंगचा विजयी ठोसा

Last Updated: Saturday, August 4, 2012, 20:23

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॉक्सर देवेंद्रोसिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. ४९ किलो वजनी गटात त्यानं विजय मिळवला. देवेंद्रोनं मंगलोलियाच्या सेरदाम्बा पुरेवदोर्जला पराभूत केलं.त्यानं १६-११नं विजय मिळवला.

भारतीय खेळाडूवर अन्याय, विकास जिंकूनही हारला

Last Updated: Saturday, August 4, 2012, 10:40

ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये 69 किलो वजनीगटात विकास कृष्णनला जिंकल्यानंतरही पराभूत घोषित करण्यात आलं आहे. विकासनं 13-11 नं अमेरिकन बॉक्सरवर विजय मिळवला होता.

मुष्टियोद्धा विजेंदर क्वार्टर फायनलमध्ये

Last Updated: Friday, August 3, 2012, 11:32

बीजिंगमधील कांस्य पदक विजेता २६ वर्षीय विजेंदर याने गुरूवारी रात्री एक्सेल एरिनामध्ये झालेल्या सामन्यात अमेरिकन बॉक्सर टेरेल गौशा याचा १६-१५ने पराभव केला.

रहा चिरतरुण!

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 10:41

आजचा ‘झी २४ तास’चा स्पेशल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरत असलेली ब्यूटी क्रीम खरेदी करणं बंद कराल. आता ती वेळ लवकरच येणार असून, तुम्ही वृद्धत्व रोखण्यासाठी घेत असलेली औषधं खरेदी करणं बंद कराल. आपण आयुष्यभर तरुण दिसावं असं तुमचं जर स्वप्न असेल तर तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय संशोधकांनी शोधून काढलंय असं औषध, जे तुम्हाला वयाच्या सत्तरीतही तरुण ठेवणार आहे.

'बोल बच्चन'ने कमावले ४ दिवसांत ७२ कोटी

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 10:42

अजय देवगण आणि अभिषेक बच्चनच्या बोल बच्चनने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली आहे. रिलीज झाल्या दिवसापासून बोल बच्चनने आत्तापर्यंत ७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

२०१३ मध्ये येतोय 'फायरफॉक्स' मोबाइल

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 13:01

मोबाइलप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. झेडटीई आणि टीसीएल या मोबाइल बनवणाऱ्या कंपनीने २०१३ या औद्योगिक वर्षात पहिला फायरफोक्स ओएस फोन बाजारात आणणार आहे.

'रावडी राठोड'ने केली १० दिवसांत १०० कोटींची कमाई

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 12:42

बॉलिवूडचा ऍक्शन कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. अक्षय कुमारच्या रावडी राठोड या सिनेमाने केवळ १० दिवसांत १०० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करण्याचा विक्रम केला आहे.

दुषित दूध देतेय हृदय रोगाला निमंत्रण

Last Updated: Friday, May 11, 2012, 17:10

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करून ऑक्सिटॉजीनच्या साठ्यासह एकाला अटक केलीय. गायी - म्हशींनी जास्त दूध द्यावं यासाठी हे रसायन इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र यामुळे दुधाचं सेवन करणा-यांच्या शरिरावर घातक परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

'हिवाळी अधिवेशना'मुळे दुकानदाराला मनस्ताप

Last Updated: Thursday, April 12, 2012, 08:03

हिवाळी अधिवेशनातल्या झेरॉक्सचे ११ लाखांचे बिल मिळाले नाही म्हणून, एका व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. संजय पोहरे असं या व्यावसायिकाचं नाव असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडवणुकीमुळं त्यांचं दोन वर्षांपासूनच ९ लाखांचं बिल थकलंय.

पॉपकॉर्न्सनी वाढते रोगप्रतिकारक क्षमता

Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:59

पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्याचं स्क्रँटन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. याचा अर्थ पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षाही अधिक रोगप्रतिबंधकारक तत्वं असतात.

आता बैलांच्या शर्यतीला 'कोर्टाची वेसण'

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 17:50

ग्रामीण भागात मनोरंजन आणि परंपरेच्या नावाखाली भरविल्या जाणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यंतीवर सरसकट बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जुलै २०११मध्ये केंद्र सरकारनं बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली होती.

‘अग्नीपथ’चा २५ कोटींचा रेकॉर्ड ब्रेकींग झंझावात

Last Updated: Monday, January 30, 2012, 20:44

प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित झालेल्या 'अग्नीपथ'ने पहिल्याच दिवशी २५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आत्तापर्यंतच्या बॉलिवूडच्या इतिहासात रिलीजच्या दिवशी झालेल्या कमाईतील हा सर्वाधिक कमाईचा आकडा आहे.

३००हून अधिक भारतीयांना वाचवण्यात यश

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 17:26

टायटॅनिकनंतर इटलीमध्ये कोस्टा कॉनकार्डीया अपघातामुळे सगळेच हादरले. पण या आपघातातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलय, तसच ३००हून अधिक भारतीयांनाही वाचवण्यात यश आलं आहे.

जहाजाच्या अपघातात १३० भारतीय बचावले

Last Updated: Monday, January 16, 2012, 12:56

इटलीच्या तस्कान किनाऱ्यावर जहाज दगडावर आदळल्यानं मोठा अपघात झाला आहे. यात दोन फ्रेंच प्रवासी आणि एका पेरुच्या क्रू मेंबरचा भितीनं समुद्रात उडी टाकल्यानं मृत्यू झाला आहे. या जहाजात १३० भारतीय प्रवाशांसह ४ हजार दोनशे प्रवासी होते.

बॉक्सिंग टेस्टमध्ये दडलयं काय?

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:57

बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या इनिंगमध्ये ३३३ रन्सवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सेशनमध्ये झहीर खानची बॉलिंग चांगलीच चालली. त्यानं सुरुवातीलाच कांगारुंना दोन धक्के दिले. त्यानं ब्रॅड हॅडिनला २७ रन्सवर आणि पीटर सीडलला ४१ रन्सवर आऊट केले.

पश्चिम बंगालमध्ये विषारी दारु प्यायल्याने २० जण मृत्युमुखी

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 14:26

पश्चिम बंगाल राज्याच्या मागे बहुधा शुक्लकाष्ठ लागलं असं दिसतंय. आधी सरकारी रुग्णालयात हलगर्जीपणमुळे नवजात बालकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले मृत्यु नंतर खाजगी हॉस्पिटलला लागेल्या आगीत जवळपास ९० जणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि आता विषारी दारु प्यायाल्याने ३० लोकांचा मृत्यू ओढावला आहे

सिनेमाचे नव्हे मालिकेचे बजेट १०० कोटी रुपये

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 11:38

अनिल कपूरने नुकतेच ट्वेंटिएथ सेच्यूरी फॉक्सबरोबर 24 ही मालिका करण्यासाठी करार केला. जगभरातील मालिकांमध्ये हेरगिरीच्या कथानकावर आधारीत सर्वाधिक काळ चाललेली ही मालिका आहे. अनिल कपूर आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये झालेला करार आहे तब्बल १०० कोटी रुपयांचा आहे. ट्वेंटिएथ सेंच्यूरी फॉक्सची ही सर्वात जास्त नफा कमावणारी मालिका असून अमेरिकेबाहेर पहिल्यांदाच या मालिकेची निर्मिती करण्यात येत आहे.

अखिलकुमार, सुरंजॉयची दुसर्‍या फेरीत धडक

Last Updated: Sunday, October 9, 2011, 14:26

अखिलकुमार आणि सुरंजॉय सिंग या हिंदुस्थानच्या स्टार बॉक्सर्सनी अझरबैझान येथील बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या दुसर्‍या फेरीत पाऊल टाकले.