निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

Last Updated: Friday, June 20, 2014, 21:57

विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात

Last Updated: Monday, June 16, 2014, 17:10

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जास्तच जास्त जागांची मागणी करणार आहे, असं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दीपिका पदूकोण 8 करोडोंची `मस्तानी`!

Last Updated: Friday, June 6, 2014, 15:34

सिनेनिर्माता संजय लीला भन्साळी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘बाजीराव मस्तानी’साठी तयार आहे... आपल्या या आगामी प्रोजेक्टसाठी हात आखडता न घेता ‘दिल खोलके’ खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाहीए

पंतप्रधान मोदींच्या चाबकाचा पहिला फटका खासदार प्रियंका रावतना

Last Updated: Sunday, June 1, 2014, 16:11

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप कडक आणि शिस्तीचे आहेत हे तर सर्वांनाच आता माहिती झालंय. याचा प्रत्यय त्यांच्या खासदारांनाही येतोय. बाराबंकी इशल्या नव्यानं निवडून आलेल्या खासदार प्रियंका सिंह रावत यांनी वडिलांनाच आपलं खासदार प्रतिनिधी बनवल्यामुळं मोदी चांगलेच तापले.

40 वर्षांनी लहान तरुणीच्या बाळाचा बाप होणार इमरान?

Last Updated: Thursday, May 8, 2014, 10:21

पाकिस्तानल्या राजकारणातला एक मोठा नेता आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या कथित नव्या प्रेमसंबंधांमुळे पाक राजकारणात एकच खळबळ उडालीय.

`मुलगी वाचवा` अभियान हेच `जीवती रै बेटी`चं लक्ष्य

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 14:18

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध नेहमीच समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असतात. स्त्रीभ्रूणहत्येवर समाजात जागृती करण्याचं काम काही सामाजिक संघटना करत आहेत. यात भर पडावी म्हणून स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारा `जीवती रै बेटी` हा हिंदी सिनेमा येणार आहे.

प्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी

Last Updated: Sunday, May 4, 2014, 13:08

बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.

छोटे राणे निवडणूक लढवणार नाही!

Last Updated: Sunday, April 27, 2014, 10:31

नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटवरवरुन त्यांनी ही माहिती दिलीय.

दीपिका-रणवीरचं `चोरी चोरी, चुपके चुपके`!

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 13:41

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह‍ यांचं नक्की काही तरी सुरु आहे.

भारतीय अॅपची `स्काइप`ला टक्कर

Last Updated: Saturday, March 29, 2014, 19:41

मायक्रोसॉफ्टच्या स्काईपला एक भारतीय अॅप टक्कर देणार आहे. `आवाज` नावाचे हे अॅप वाय-फाय नेटवर्कने युझर्स फ्री कॉल करु शकतो.

बँकांची `एटीएम`सह, सर्व्हिस चार्ज वाढवण्याची तयारी

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 12:02

बँकांनी एटीएम ट्रांझॅक्शन फी वाढवली नसली, तरी दुसऱ्या सेवांसाठी चार्जेस वाढवायची तयारी काही बँकांनी सुरू केली आहे.

इंटरनेट बँक व्यवहार सुरक्षित

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 09:53

आपल्या इंटरनेट बँकेच्या व्यवहारावर कोणाची तरी नजर आहे. म्हणून तुम्ही जर घाबरत असला तर, आता घाबरण्याची काहीच गरज नाही.

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:46

राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.

सावधान! डेबिट-क्रेडिट कार्डवर डल्ला मारणारा `डेक्स्टर ब्लॅक` भारतात!

Last Updated: Monday, January 20, 2014, 09:42

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या आणि त्याद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनो जरा हे वाचा... सध्या कार्डवरील गुप्त माहिती चोरणारा व्हायरस भारतात दाखल झालाय. ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या नव्या धोरणाला हॅक करणारा व्हायरस आता तयार झालाय.

स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणाऱ्या अन्सारीला जन्मठेप

Last Updated: Friday, December 27, 2013, 15:26

मुंबईतल्या बांद्राभागात २७ वर्षीय स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणा-या बादशाह मोहम्मद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुंबई सेशन्स कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गेल्या वर्षी ७ नोव्हेबरला बादशाह मोहंम्मद अंन्सारीनं स्पॅनिश मुलीवर बलात्कार केला होता. त्याचबरोबर चोरीच्या प्रकरणातही कोर्टानं अंन्सारीला शिक्षा सुनावली आहे.

सुहास खामकरच्या विंटर टिप्स

Last Updated: Thursday, December 19, 2013, 18:56

हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम कसा करावा आणि कशाप्रकारे आहार घ्यावा हे जाणून घ्या स्वत: सुहास खामकरच्या फिटनेस टिप्समधून...

LIVE : विधानसभा निवडणूक २०१३ चा निकाल

Last Updated: Sunday, December 8, 2013, 19:57

आगामी लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनलचा निकाल आज लागणार आहे. देशाची राजधानी दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कौल आज स्पष्ट होणार आहे.

फिल्म रिव्ह्यूः रामलीलाः रोमान्सची अद्भूत रासलीला

Last Updated: Friday, November 15, 2013, 21:36

अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर अखेर रामालीला हा चित्रपट आज रिलीज झाला. दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की ते खरोखर मोठ्या पडद्याचे जादूगार आहेत.

‘रामलीला’ काढून टाका – हायकोर्टाचे आदेश

Last Updated: Thursday, November 14, 2013, 21:54

‘गोलियों की रासलीला – रामलीला’ या सिनेमातून ‘रामलीला’ हा शब्द हटवण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दिलेत. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.

दिल्लीमध्ये रामलीला रिलीज करण्यास नकार

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 16:17

निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळीचा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण आहेत. परंतु दिल्लीमधील एका न्यायालयाने हा सिनेमा रिलीज करण्यास नकार दिला आहे.

... असा आहे दीपिकाचा प्रेमाचा फंडा!

Last Updated: Saturday, November 9, 2013, 13:22

आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय.

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

Last Updated: Friday, November 8, 2013, 22:50

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

दीपिकानं दिली तिच्या प्रेमाची कबुली!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 14:44

सध्या दीपिका आणि रणवीर यांच्या केमेस्ट्रीच्या चर्चा खूप रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे यावर चर्चा करायला आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला दीपिकाला खूप आवडतंय, अशी कबुलीच तिनं दिलीय.

पाटणा बॉम्बस्फोट : मुख्य संशयित आरोपी तारिकचा मृत्यू

Last Updated: Friday, November 1, 2013, 16:32

पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.

राष्ट्रपित्याची १४४ वी जयंती...

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 13:32

आज गांधी जयंती जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा महात्म्याचा आज जन्मदिवस... जगभरात आजचा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

‘रामलीला’तल्या ‘तत्तड तत्तड’वर रणवीर थिरकला!

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 14:50

निर्माता निर्देशक संजय भन्साळींचे चित्रपट हे ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. त्यांच्या चित्रपटांचे सेट्स नितांत सुंदर, वास्तवाच्या जवळ जाणारे आणि महागडे असतात म्हणूनच त्यांना आघाडीचे चित्रपट निर्माता म्हटलं जातं. संजय भन्साळींचा आगामी प्रदर्शित होणारा ‘रामलीला’ हा चित्रपटही याच श्रेणीतील.

‘त्या’ चिरमुडीनं वाचवले दीडशे जणांचे प्राण!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 10:41

शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...

‘फिगर पे मत जा, वरना ट्रिगर दबा दूंगी’

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:43

बॉलिवूडमध्ये सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’च्या ट्रेलरची जोरदार आणि खमंग चर्चा सुरू आहे.

गोकुळाष्टमीचा उत्सव जल्लोषात

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 18:02

आज कृष्ण जन्माष्टमी आहे. कंसाचा विनाश करणाऱ्या श्रीकृष्णाचा आज जन्मदिवस आहे. संपूर्ण देशभरात हा जन्मदिवस गोकुळाष्टमीच्या रूपात साजरा केला जातो. मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असल्याचं मानलं जातं.

सिंचन मुद्यावरून विरोधकांचा ठिय्या, कामकाज तहकूब

Last Updated: Monday, July 29, 2013, 16:41

सिंचनाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे अखेर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय. मात्र विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतच ठिय्या मांडला.

भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:17

भारताने तयार केलेला इन्सॅट-३ डी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय. या उपग्रहामुळे हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक संकटाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

बन्सल यांच्या राजीनाम्याचा मुंबईकरांना फटका!

Last Updated: Monday, May 13, 2013, 17:39

बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णवेळ मंत्रीच नाही. त्यातच महत्त्वाची पदं रिक्त आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियाच ठप्प झाली आहे. या सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

पाकमध्ये नवाज शरीफांची सत्तेकडे वाटचाल

Last Updated: Sunday, May 12, 2013, 08:42

साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या पाकिस्तानातल्या ऐतिहासिक निवडणुकांच्या मतमोजणीत नवाज शरीफ आणि इमरान खान यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे.

पवनकुमार बन्सल यांच्यापाठोपाठ अश्विनीकुमारांचाही राजीनामा

Last Updated: Friday, May 10, 2013, 22:07

रेल्वेतील लाचखोरी प्रकरण पवनकुमार बन्सल यांना चांगलंच भोवलंय. पंतप्रधानांची भेट घेऊन बन्सल यांनी रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा सादर केलाय.

पाक क्रिकेट जगत चिंतेत... इमरानसाठी दुआँ!

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:20

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इंसाफचे सर्वेसर्वा उंचावरून पडून इमरान खान गंभीर झाल्याची बातमी पसरली अन क्रिकेट जगतातही चिंतेचं वातावरण पसरलंय.

इमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 09:17

पाकिस्तानच्या तहरिक–ए-इंसाफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान एका प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून खाली पडून गंभीर जखमी झालेत. लाहोरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.

'विरोधी पक्षाला राजीनामा मागण्याचा रोग'

Last Updated: Saturday, May 4, 2013, 19:17

काँग्रेसनं रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावलीय. एव्हढंच नाही तर या पद्धतीनं राजीनामे मागण्याचा रोगच विरोधी पक्षाला लागल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.

रेल्वेमंत्र्यांच्या भाच्याला लाच घेताना अटक

Last Updated: Saturday, May 4, 2013, 11:21

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या युपीए सरकारच्या अडचणी वाढतच चालल्यात.. वेगवेगळ्या मंत्र्यांची नावं विविध घोटाळ्यात समोर येतायत.

सलमानने कोणाची उडवली झोप?

Last Updated: Monday, April 29, 2013, 13:42

बॉलिवुड अभिनेता सलमान खान आजकाल जे काही करतो त्यातून त्याची दंबगगिरी झळकत असते. त्याने अशीच आपली दबंगगिरीची झलक एका निर्मात्याला दाखवून दिली आहे. सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा मेंटलचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. त्याच्या व्यस्त वेळपत्रकावर सगळे निर्माते डोळा ठेवून असतात.

मुंबईतला इंजिनीअर पाकिस्तानात बेपत्ता

Last Updated: Monday, April 29, 2013, 12:19

नोकरीच्या शोधात आफिगाणीस्तानात गेलेला २७ वर्षीय पाकिस्तानात बेपत्ता झाला आहे. पाकिस्तानात त्याचे अपहरण अथवा त्यासोबत काही घातपात घडल्याचा संशय त्याच्या वर्सोवा येथे राहण्याऱ्या कुंटुबियांनी व्यक्त केला आहे.

`केवळ `आधार` नाही म्हणून जनता निराधार नाही`

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 12:36

अनुदान किंवा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, केवळ आधारकार्ड नाही म्हणून हे लाभ मिळण्यात लाभधारक व्यक्ती अपात्र ठरणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील रहिवाशांना दिलंय.

खडसेंचा राज ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 14:07

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं आहे. आपण बाहेर काढलेल्या प्रकरणांमुळे अनेक बिल्डर दुखावले गेले आहेत.

दिल्लीत दाखवला सुप्रिया सुळेंनी मराठी बाणा

Last Updated: Friday, March 1, 2013, 19:21

‘श्रीमती सुप्रिया सुळे... आप आप भी मराठी मे बोलना चाहेंगे....‘ असं संसंदेतील अध्यक्षांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारताच त्यांच्या मागून एकच आवाज झाला ‘हा मराठीमेही बोलेंगे ओ...’

नागपूरवर पवनकुमारांची कृपादृष्टी

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 17:03

रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी निराशाच आली आहे. त्यातल्या त्यात नागपूरवर रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांची कृपादृष्टी पडली आहे. त्यामुळे नागपुरला काही प्रमाणात फायदा मिळाला आहे.

रेल्वेचा तोटा... वाढता वाढता वाढे!

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 15:20

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे यंदा पुन्हा एकदा तोट्यात जाण्याची शक्यता व्यक्त केलीय.

रेल्वेबजेट : नवी `ई-तिकीट प्रणाली` सुरू करणार

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 14:56

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी, यावर्षीच्या अखेरपर्यंत रेल्वे नवी ई-तिकीट प्रणाली सुरू करणार असल्याचं म्हटलंय. ज्यामुळे ऑनलाईन तिकीट बुकींग सेवेला गती प्राप्त होऊ शकेल.

काय दिले महाराष्ट्राला रेल्वे बजेटमध्ये?

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 15:05

केंद्रीय रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ वर्षाचे रेल्वे बजेट सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काही घोषणा केल्या. तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे बजेट : भाडेवाढ नाही, पण छुपा सरचार्ज

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 14:40

सर्वसामान्यांच्या नजरा मात्र आपल्या खिशाला आणखी ताण पडणार की ट्रेनच्या सुविधांमध्ये थोडी फार भर पडून दिलास मिळणार याकडे लागून राहिलंय. चला, पाहुयात काय काय मांडलं गेलंय या अर्थसंकल्पात...

आज संसदेत सादर होणार `रेल्वे बजेट`!

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 10:31

२०१३-१४ या वर्षासाठी आज संसदेत रेल्वेबजेट सादर होणार आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल हा अर्थसंकल्प सादर करतील. तब्बल १७ वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री संसदेत बजेट सादर करणार आहेत.

तीन नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरीत फ्लेक्सचा महापूर

Last Updated: Sunday, February 17, 2013, 20:07

तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.

रेल्वे ब्रिज ठिकठाक, चेंगराचेंगरीमुळे अपघात - रेल्वेमंत्री

Last Updated: Monday, February 11, 2013, 14:38

अलाहाबाद रेल्वे स्टेशनवरील फुट ओव्हर ब्रिज तुटला नसल्याचा दावा रेल्वेमंत्री पवनकुमार बंन्सल यांनी केलाय. फुटओव्हर ब्रिजची रेलिंगसुद्धा तुटली नसल्याचं रेल्वेमंत्र्याचा दावा आहे. स्टेशनवरील चेंगराचेंगरी तुफान गर्दीमुळं झाल्याचा दावा त्यांनी केलाय.

जिंदालवर ‘मोक्का’सह आरोप निश्चित

Last Updated: Saturday, February 9, 2013, 17:32

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्यातील प्रमुख आरोपी अबू जिंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारीवर शुक्रवारी विशेष मोक्का कोर्टात आरोप निश्चित करण्यात आलेत.

रेल्वेमंत्र्यांकडून प्रवाशांची फसवणूक; पु्न्हा दरवाढ लादणार?

Last Updated: Friday, February 8, 2013, 09:48

तोटा भरुन काढण्यासाठी प्रवाशांच्या खिशावर पुन्हा डल्ला मारण्याचा घाट रेल्वे मंत्रालयानं घातलाय. अर्थसंकल्पात पुन्हा रेल्वेच्या भाड्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत, याचाच अर्थ असा होतो की, रेल्वे मंत्री लाखो प्रवाशांची फसवणूक करत आहेत.

प्रतिकूल परिस्थितीतही `जहांगिरी` कायम!

Last Updated: Tuesday, February 5, 2013, 16:16

जहांगीर अन्सारी... कोणत्याही प्रकारची क्रिकेटची पार्श्वभूमी नाही, घरची परिस्थिती बेताचीच. या साऱ्या प्रतिकूल परिस्थिवर मात कणाऱ्या तेरा वर्षांच्या या मुंबई अंडर १४ टीमच्या क्रिकेटरची संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी...

भारत- पाक तणाव : सुरक्षा सल्लागारांची विरोधकांशी भेट

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 12:14

भारत- पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली.

कलंक

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 23:40

गेल्या काही महिन्यात मायानगरी मुंबई महिला असुरक्षित असल्याचं चित्र निर्माण झालंय...अपहरण, बलात्कार,खून, लैंगिक छळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे महिलांना लक्ष्य केलं जातंय...

महिलांची सुरक्षा रामभरोसे

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 23:05

महिला किती असुरक्षित आहेत हे कांदिवलीत घडलेल्या घटनेवरुन तुमच्या लक्षात येईल...एका तरुणाने घरात घुसुन एका विवाहित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला....काही दिवसांपूर्वी त्या पीडित महिलेशी त्या तरुणाचं भांडण झालं होतं आणि त्यातूनच हा प्रकार घ़डल्याचं बोललं जातंय.

माणुसकीला काळीमा... ६२ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 07:54

दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिक गुन्हेगारांचं सावज बनत चालले आहेत..माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतेच मुंबई घडलीय..एका आरोपीने ६२ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केलाय.

बोन्साय झाड चार्ज करणार मोबाइल

Last Updated: Sunday, December 2, 2012, 18:07

फ्रान्सच्या एका डिझायनरने एक असं बोन्साय ट्री तयार केलं आहे, जे केवळ दिसायलाच शोभिवंत असेल असं नाही, तर सौर ऊर्जेचा वापर करून हे बोन्साय ट्री मोबाइल आणि इतर विद्युत उपकरणंही चार्ज करू शकेल.

मुंबईत महिला असुरक्षित

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 23:33

अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

रेल्वे भाडेवाढीचे नव्या मंत्र्यांचे संकेत

Last Updated: Monday, October 29, 2012, 22:25

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे भाडेवाढीला विरोध केला असताना आता पुन्हा काँग्रेसने रेल्वेची भाडेवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नव्याने रेल्वेमंत्री झालेले पवनकुमार बन्सल यांनी सुधारणा करण्याच्या नावाखाली भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म

Last Updated: Thursday, October 4, 2012, 19:04

लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.

‘प्रेगनन्सी क्लॉज’ला करीनाचा नकार, रामलीलामधून बाहेर!

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 15:48

या सिनेमात करीना मुख्य भूमिकेसाठी ही फिल्म साईन करत होती पण, तिनं प्रेगनन्सीच्या बाबतीतल्या अटींना नकार दिल्यानं तिला या चित्रपटातून बाहेर पडावं लागलंय.

मुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री

Last Updated: Monday, September 10, 2012, 11:45

मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.

मारुती सुझुकीचा कारखाना बंदोबस्तात सुरू

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:25

कामगार आणि व्यवस्थापनातील वादामुळे हरियानातील गुडगावमधील गेल्या महिनाभरापासून बंद असलेला मारुती सुझुकीचा मनेसर येथील कारखाना कडक पोलीस बंदोबस्तात आज मंगळवारी उघडण्यात आला.

हमीद अन्सारी यांनी घेतली शपथ

Last Updated: Saturday, August 11, 2012, 13:54

देशाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पदाची शपथ घेतलीय. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी दुस-यांदा शपथ घेतली.

आजपासून संसदेचं मान्सून अधिवेशन

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:31

राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.

अन्सारी पुन्हा उपराष्ट्रपती

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 07:28

हमीद अन्सारी पुन्हा एकदा भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवडून आले आहेत. यूपीएचे उमेद्वार असलेल्या अन्सारींनी एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांचा पराभव केलाय.

पुन्हा एकदा अन्सारी उपराष्ट्रपतीपदावर?

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 11:01

उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार असून युपीएकडून हमीद अन्सारी आणि एनडीएकडून जसवंत सिंग उमेदवार आहेत. या निवडणूकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात.

उपराष्ट्रपतीपदासाठी अन्सारींचा अर्ज दाखल

Last Updated: Thursday, July 19, 2012, 09:01

उपराष्ट्रपतीपदाचे युपीएचे उमेदवार म्हमून हमीद अन्सारींनी अर्ज दाखल केलाय. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि युपीएतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र यावेळी तृणमुल काँग्रेसचा एकही प्रतिनिधी हजर नव्हता.

गृहनिर्माण विधेयक मंजूर... बिल्डरांना वेसण

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 10:52

बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विधानसभेत गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळं फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना वेसण घालायला मदत होणार आहे.

एनडीएने दिली जसवंत सिंग यांना उमेदवारी

Last Updated: Monday, July 16, 2012, 12:39

एनडीएने देशाच्या उपराष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी नेते जसवंत सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी ही घोषणा केली आहे.

युपीएकडून अन्सारी तर बिजेपीकडून हेप्तुल्ला !

Last Updated: Sunday, July 15, 2012, 07:11

उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएनं हमीद अन्सारींच नाव जाहीर केल्यावर भाजपनंही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

हमीद अन्सारी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

Last Updated: Saturday, July 14, 2012, 20:33

प्रणव मुखर्जींची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी हमीद अन्सारी यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हमीद अन्सारी यांना दुसरी पसंती दिली होती.

आर आर पाटलांचा लागणार कस

Last Updated: Friday, July 13, 2012, 14:55

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला गृहमंत्री आर. आर. पाटील आज उत्तर देणार आहेत.

कानडी दडपशाहीचा एकमुखी निषेध

Last Updated: Friday, July 13, 2012, 09:47

बेळगाव महापालिका बरखास्तीचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. वादग्रस्त सीमाभागाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा, या आशयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पण, मनसे गटनेत्यांनी मात्र, या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांना केलीय.

अन्सारींसाठी पंतप्रधानांची ममता दिदींकडे 'फिल्डिंग'!

Last Updated: Thursday, July 12, 2012, 10:57

उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच भाकप नेते ए.बी.वर्धन यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारीच?

Last Updated: Monday, July 9, 2012, 16:47

विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांच्या गळ्यात पुन्हा उपराष्ट्रपती पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने हमीद अन्सारी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

'राम लीला'मधून करीना बाहेर

Last Updated: Monday, July 9, 2012, 14:35

करीना कपूर आणि संजय लीला भन्साळी यांचं एकमेकांबरोबर काम करायचं गेले 13 वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न अखेर धुळीस मिळालं आहे.पुरेशा तारखा नसल्यामुळे आणि मिळणारं मानधन समाधानकारक नसल्यामुळे करीना या 'राम लीला'मधून बाहेर पडली आहे.

'भारतात करायचं होतं ९/११...'

Last Updated: Thursday, June 28, 2012, 14:35

भारतात अमेरिकेतील ९/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तैय्यबानं आखला होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवादी अबू जिंदालनं केलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं ही कबुली दिलीय.

‘अबू अन्सारी माझा मुलगा नाहीच’

Last Updated: Thursday, June 28, 2012, 13:39

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातला दहशतवादी अबू अन्सारी हा आपला मुलगा नाहीच, असा दावा जबीउद्दीन अन्सारीच्या आई रेहाना बेगम यांनी केलाय.

केज निवडणूक: संगीताची सांगता, 'पृथ्वी'चे राज

Last Updated: Saturday, June 16, 2012, 12:47

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे आणि भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्यात सरळ लढत असल्याचं दिसून येतंय. १२ व्या फेरीअखेर पृथ्वीराज साठे जवळजवळ ५५०० मतांनी आघाडीवर आहेत.

कैलास मानसरोवर यात्रेला प्रारंभ

Last Updated: Sunday, June 3, 2012, 12:25

प्रसिद्ध मानसरोवर यात्रेला शनिवारपासून सुरूवात झालीय. ४७ भाविकांच्या पहिल्या गटानं आपल्या २८ दिवसांच्या यात्रेला सुरूवात केलीय.

विधानसभेत राडा, राज्यपालांवर कागद फेकले

Last Updated: Monday, May 28, 2012, 15:29

उत्तर प्रदेश विधिमंडळात आज बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ, धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करत अखिलेश यादव सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर घेरले.

पदांसाठी रस्सीखेच, अजितदादांसमोर मोठाच पेच

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:43

पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसनं निर्विवाद वर्चस्व मिळवूनही अजित दादांसमोरची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये तीन आमदार आणि शहराध्यक्ष आझम पानसरेंच्या आपसातील संघर्ष अजित दादांना डोकेदुखीच ठरतेय.

हमीद अन्सारींना राष्ट्रपती करा- लालूप्रसाद

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 12:41

जुलै महिन्यात प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. कलामांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता लालू प्रसाद यादव यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाच राष्ट्रपती करण्याची मागणी केली आहे.

'कॅग'वरून विधानसभेत जोरदार राडा...

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 15:06

बहुचर्चित कॅगचा अहवाल थोड्याच वेळापूर्वी विधानसभेत मांडण्यात आला. मात्र सदस्यांना अहवालाच्या प्रती देण्यास सरकारनं टाळाटाळ केली आहे. त्यामुळे विधानसभेत गोंधळ झाला.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मुंबई धोक्यात

Last Updated: Saturday, March 31, 2012, 21:26

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसण्याची शक्यता आयपीसीसीनं व्यक्त केलीय. मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाबाबत प्रशासनाची दुटप्पी भूमिकाच याला कारणीभूत ठरली आहे.

मनसेसाठी राष्ट्रवादीचा तिसरा उमेदवार!

Last Updated: Monday, March 19, 2012, 14:19

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवलाय. प्रकाश बिनसाळे यांनी तिसरा उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. याआधी राष्ट्रवादीनं पुण्याचा माजी महापौर वंदना चव्हाण आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी पी त्रिपाठींना उमेदवारी दिलीय.

शिवाजी स्मारकावरून विधानसभेत गोंधळ

Last Updated: Thursday, March 15, 2012, 19:55

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. दरम्यान, समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकार कटीबद्ध , असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंधळ कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

CMपदासाठी यादव पिता-पुत्राचे ‘पहले आप’!

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 21:33

उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणा-या समाजवादी पक्षाची बैठक सुरू झालीय़. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. तरूण नेते आणि मुलाय़मसिंग यांचे पुत्र अखिलेश यादव हेच उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

उत्तर प्रदेशच्या राजकीय क्षितिजावर उगवता तारा

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 12:09

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या घमासान लढाईत समाजवादी पक्षाने बहुमत प्राप्त केलं. यावेळेस काँग्रेसच्या सर्व राहुल गांधींवर पक्षाची भिस्त होती तर अखिलेश यादव समाजवादी पक्षाची धुरा सांभाळत होता. राहुल गांधींनी तब्बल २०० प्रचार सभा घेतल्या पण पदरी निराशाच आली. उत्तर प्रदेश सारख्या क्षेत्रफळाने अवाढ्य असलेल्या राज्यात मृतप्राय असलेल्या काँग्रेसला संजीवनी देणं हे तितकसं सोपं नाही.

खंडुरींची झुंज अखेर व्यर्थच....

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 08:23

उत्तराखंडमध्ये निकाराच्या झुंजीत काँग्रेसने भाजपपेक्षा अवघी एक जागा जास्त जिंकली असली तरी त्यांना बहुमत प्राप्त करता आलेलं नाही. काँग्रेसला ३२ जागा तर भाजपने ३१ जागांवर विजय मिळवला, बसपाच्या वाट्याला तीन तर इतरांनी चार जागा जिंकल्या आहेत.

उत्तर प्रदेशात चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

Last Updated: Sunday, February 19, 2012, 21:35

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान रविवारी पार पडलं. चौथ्या टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक 57 टक्क्यांहून अधिक मतदान झालं

मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:37

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

गोवा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

Last Updated: Monday, February 6, 2012, 15:21

आगामी गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने २२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीत खासदार श्रीपाद नाईक यांचा अपवाद वगळता सर्व महत्वाच्या नावांचा समावेश आहे.

'लीलां'ची 'लीला', रोमिओ-ज्युलिएटची प्रेमलीला

Last Updated: Thursday, February 2, 2012, 15:03

रोमिओ एन्ड ज्युलिएट यांची प्रेमकथा आपण अनेक हॉलिवूड सिनेमांमधून पाहिली आहे. आणि आता बॉलिवूडमध्येही रोमिओ एन्ड ज्युलिएट यांच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा येतो आहे. मात्र बॉलिवूडचे हे रोमिओ एन्ड ज्युलिएट आहेत तरी कोण आणि कोण दिग्दर्शित करतंय?

रणसंग्राम २०१२चे नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन

Last Updated: Monday, January 30, 2012, 17:33

राज्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याची बित्तम बातमी पाहण्यासाठी झी 24 तासनं खास नवी वेबसाईट सुरू केली आहे. रणसंग्राम २०१२ या नव्या वेबसाईटचं उदघाटन नुकताच उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं.

गोव्यात कुणाचंच काही खरं नाही....

Last Updated: Thursday, January 26, 2012, 18:11

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला आहे. गोव्यासह उत्तर प्रदेशचीही विधानसभा निवडणूक होते आहे. उत्तर प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्यानं सर्वच पक्षांनी तिथं लक्ष केंद्रीत केल आहे.

औरंगाबादेत युतीला तगडं आव्हान

Last Updated: Monday, January 23, 2012, 19:28

मराठवाड्याची राजधानी असलेला औरंगाबाद शिवसेना भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला गेल्या विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तडे गेले. आता झेडपी राखण्याचं मोठं आव्हान युतीसमोर आहे.