अक्षयचा `हॉलिडे` 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल

Last Updated: Monday, June 23, 2014, 18:55

अक्षय कुमारची फिल्म `हॉलिडे- अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी` नं तीन आठवड्यात 100 कोटी रुपये कमावले आहेत. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित ही फिल्म 6 जूनला प्रदर्शित झाली होती.

कॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई

Last Updated: Sunday, June 22, 2014, 18:37

गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.

मुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार

Last Updated: Sunday, June 22, 2014, 10:14

बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

बीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार

Last Updated: Saturday, June 21, 2014, 22:54

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

एलफिन्स्टनच्या नमन टॉवरला आग

Last Updated: Saturday, June 21, 2014, 20:36

मुंबईत एलफिन्स्टनच्या नमन टॉवर या इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. टॉवरमध्ये अडकलेल्या चार ते पाच जणांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

मरिन ड्राईव्हवर अपघात; बड्या बिल्डरचा बेटा अडकला

Last Updated: Saturday, June 21, 2014, 11:07

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री साडेतीनच्या सुमारास एका २४ वर्षीय मुलाला भरधाव वेगानं जाणाऱ्या एका गाडीनं उडवल्यानं त्याचा मृत्यू झालाय.

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

Last Updated: Friday, June 20, 2014, 21:57

विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

ट्विटरवर `लाईव्ह व्हिडिओ` शेअर करणंही होणार शक्य

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:59

सोशल वेबसाईट ट्विटर आपल्या यूजर्सना एक नवीन आणि महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे...

भारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त

Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:36

इराकमध्ये मोसूल शहरातल्या ४० भारतीय नागरिकांशी भारत सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे इराकमध्ये असलेल्या भारतीयांचे नातेवाईक अतिशय चिंताग्रस्त आहेत.

श्रद्धा-आदित्य सिक्रेट हॉलिडेच्या मूडमध्ये...

Last Updated: Thursday, June 19, 2014, 12:09

आशिकी-2 या सिनेमापासून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या रोमान्सच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात.

व्हिडिओ: इराकमधली भीषण परिस्थिती आणि नरसंहाराची दृश्यं

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 22:04

इराकमधलं संकट अधिकाधिक गहीरं होत जातंय. इराकमधल्या या अमानूष नरसंहाराचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय. अतिशय क्रूर असा हा व्हिडिओ तुम्हाला विचलीत करू शकतो.

महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची साठेबाजांवर करडी नजर

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 19:10

गेल्या पाच महिन्यांतला रेकॉर्ड महागाई दर, मान्सून कमी होण्याची शक्यता आणि इराकमध्ये चिघळत चाललेली परिस्थिती या तीन गोष्टी सामान्यांचं कंबरडं मोडू शकतात. याच पार्श्वभूमीवर महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. याच संदर्भात मोदींनी कॅबिनेटची बैठक घेतली.

इराकमध्ये 40 भारतीयांचे अपहरण

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 10:13

इराकमध्ये 40 भारतीय कामगारांचे अपहरण करण्यात आले आहेत. मात्र, या अपहरणाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.

तमन्नानं साजिदला बनवलं ‘दादा’!

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 09:36

‘हिम्मतवाला’ फेम तमन्ना भाटिया आणि सिनेदिग्दर्शक साजिद खान यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून मीडियात चांगल्याच चघळल्या जात होत्या... पण, या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं तमन्ना म्हणतेय.

मुंबईकर तरूणीचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई थांबली

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 13:45

मुंबईकर तरूणीचा जीव धोक्यात होता पण तिचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई शहर काही काळासाठी थांबल आणि त्या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा एक माणुसकीचे जीवंत उदाहरण चेन्नईकरांनी जगाला दाखवून दिलं आहे.

नरसंहार... इराक सैनिकांना उघड-उघड घातल्या गोळ्या

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 12:35

आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा इसिस` या अलकायदाचं समर्थन असलेल्या  दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात

Last Updated: Monday, June 16, 2014, 17:10

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जास्तच जास्त जागांची मागणी करणार आहे, असं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

सावधान..! समुद्राला आजही उधाण

Last Updated: Sunday, June 15, 2014, 15:30

मुंबईकरांनो सावधान.. समुद्राला आजही उधाण आहे... सुट्टीचा आनंद बीचवरून घ्या.. पण पाण्यात उतरू नका..

आयटम नंबर नाही करणार : विद्या

Last Updated: Sunday, June 15, 2014, 12:02

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आता एकही आयटम सॉग करणार नाही असं सांगतेयं. कारण की, तिला आयटम सॉग करताना मजा येत नाही असं तिच म्हणणंय.

कार्बनचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात!

Last Updated: Saturday, June 14, 2014, 20:50

कार्बन मोबाईल कंपनीनं `Karbonn A50s` हा सर्वात स्वस्त अॅन्ड्रॉईड फोन बाजारात आणलाय.

अखेर अरविंद केजरीवाल सरकारी निवासस्थान सोडणार

Last Updated: Saturday, June 14, 2014, 20:32

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.

‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!

Last Updated: Saturday, June 14, 2014, 20:09

‘कॅम्प कोला’ रहिवाशांना महापालिकेनं ४८८ कलमाअंतर्गत नोटीस बजावलीय. वारंवार नोटीस बजावूनही घराच्या चाव्या महापालिकेकडं सुपुर्त न केल्यामुळं ही नोटीस बजावण्यात आलीय.

घरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान

Last Updated: Friday, June 13, 2014, 22:04

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.

समुद्र किनाऱ्याची मजा लुटा, पण सुरक्षा नियमांचं पालन करा

Last Updated: Friday, June 13, 2014, 20:29

यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय. 13 जून ते सप्टेंबर 12 या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय.

मुख्यमंत्री व्हायचंय मला! राज ठाकरेंमध्ये आमूलाग्र बदल

Last Updated: Friday, June 13, 2014, 19:51

आगामी विधानसभा निवडणूक स्वतः लढण्याची तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःमध्ये अमूलाग्र बदल केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांची पूर्ण लाईफस्टाईलच बदललीय. विधानसभा निवडणुकीत पक्षाची व्यूहरचना ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावलाय.

तुमच्या भाषेत काम करणारा नवा मायक्रोमॅक्सचा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन

Last Updated: Friday, June 13, 2014, 19:18

भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सने दोन आठवड्याच्या आतच यूनाइट सीरिजचा दुसरा फोन बाजारात आणलाय. कंपनीचा यूनाइट 2A106 हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर युनाइट A092 आता बाजारात आला आहे.

कराड येथील अपघातात 7 ठार, 5 जण गंभीर

Last Updated: Friday, June 13, 2014, 14:55

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळील पेरले गावाजवळ जीप आणि ट्रकच्या अपघातात 7 जण ठार तर 5 जण गंभीर जखमी झालेत. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला.

मुंबईत समुद्रात आजही हायटाईडची शक्यता

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:09

मुंबईच्या समुद्रात आजही हायटाईड येण्याची शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे.काल दुपारी मुंबईच्या समुद्रात अचानक उंचच उंच लाटा उसळल्या होत्या.

ठाणे जिल्ह्याचं विभाजन की त्रिभाजन, उद्या निर्णय

Last Updated: Thursday, June 12, 2014, 16:12

ठाणे जिल्ह्याचं विभाजन करायचं की त्रिभाजन यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या निर्णय होणार असल्याचं, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

...या दिवशी येणार हायटाईड, मुंबईकरांनो जपून!

Last Updated: Thursday, June 12, 2014, 15:48

यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोडा मुंबई हवामान खात्यानं वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जारी केलीय.

ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा... प्रियांका-शाहिद एकत्र!

Last Updated: Thursday, June 12, 2014, 14:20

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसण्याची शक्यता आहे. या दोघांच्या अफेअर आणि ब्रेक अपच्या चर्चानंतर अनेक वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

बीड - औरंगाबाद महामार्गावरील अपघातात 8 ठार

Last Updated: Thursday, June 12, 2014, 15:45

बीड - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेले सर्व आंबेजोगाईचे रहिवासी आहेत. हा अपघात सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास झाला.

‘ओप्पो’चा सर्वात सडपातळ स्मार्टफोन ‘आर 3’ बाजारात…

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 18:31

चीनची राजधानी बीजिंगमध्ये मंगळवारी ‘ओप्पो’ या मोबाईल कंपनीनं आपला सर्वांत सडपातळ ४जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. ‘आर 3’ असं या आर सीरिजमधल्या मोबाईलचं नाव आहे.

राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 13:46

राज्यात चेन स्नॅच‌िंगच्या घटना खूप मोठ्या संख्येनं घडतांना दिसतायेत. नागपूरातही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढलाय. या चोरांचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर सेलिब्रेटींच्या नातेवाईकांनाही बसतोय. द वॉल राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही हा फटका बसलाय.

कॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 08:00

कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.

धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:25

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

डॉक्टरचा अवघ्या २७ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:14

केईएमच्या रूग्णालयाचे निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा यांना वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

२६५ माजी खासदारांना सरकारी निवासस्थाने सोडण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:10

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून नवनविन निर्णय होत आहेत. आता तर 265 माजी खासदारांना सरकारी घरे खाली करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. नवनिर्वाचित खासदारांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसभा सचिवालयाने घरे खाली करण्याचे आदेश दिलेत.

कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेची नव्याने नोटीस

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:39

कॅम्पाकोला रहिवाशांना मुंबई महापालिकेने नव्याने नोटीस पाठवली आहे. १२ जूनला संध्याकाळपर्यंत चाव्या ताब्यात देण्याबाबत या नोटीशीत म्हटलंय.

गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

Last Updated: Monday, June 9, 2014, 14:32

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

`सबका साथ, सबका विकास` मोदी सरकारचा अॅक्शन प्लान

Last Updated: Monday, June 9, 2014, 12:50

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करत आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषण सुरू आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे, महागाई आणि चलनफुगवट्याचा मुकाबला करणं यासह भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या मुद्यांचा समावेश राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आहे.

चंद्राबाबूंच्या शपथविधीला चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डींची दांडी

Last Updated: Sunday, June 8, 2014, 22:37

तेलंगणाविरहित आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली.

मुजरा पार्टीवर छापा, 12 मुली, 14 पुरूष अटकेत

Last Updated: Sunday, June 8, 2014, 22:16

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कलोते गावामध्ये मुजरा पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून अश्लील वर्तवणूक करणाऱ्या १२ मुली आणि १४ पुरुषांना अटक केली आहे.

एसटी बस आणि दुचाकीची धडक, 3 ठार

Last Updated: Sunday, June 8, 2014, 21:00

लातूर जिल्ह्यातील औसा-लामजना मार्गावर चलुबर्गाजवळ एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झालाय

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध- गडकरी

Last Updated: Sunday, June 8, 2014, 18:25

स्वतंत्र विदर्भासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं, भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

फिल्म रिव्ह्यू : ‘हॉलीडे’ अक्षयचा ‘मास्टर स्ट्रोक’!

Last Updated: Saturday, June 7, 2014, 10:54

अक्षय कुमार बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, ज्याला प्रत्येक कला अवगत आहेत. कॉमेडी असो किंवा अॅक्शन अक्षय दोन्हीत फीट. अक्षय म्हणजे बॉलिवूडमधील फुल फ्लेज्ड एंटरटेनर, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मनोरमा सदन महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

Last Updated: Saturday, June 7, 2014, 10:20

मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.

पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते

Last Updated: Friday, June 6, 2014, 19:52

राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत 6 जखमी

Last Updated: Friday, June 6, 2014, 20:45

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत.

सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:35

मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.

मुंडेंच्या अपघाताची CBI चौकशीबाबत मोदी निर्णय घेतील - गडकरी

Last Updated: Thursday, June 5, 2014, 22:52

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताच्या CBI चौकशीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असं नितीन गडकरींनी म्हटलंय. काल आपण मोदी आणि मुंडेंच्या कुटुंबियांशी चर्चा केली.

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

Last Updated: Thursday, June 5, 2014, 19:54

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

`कॅम्पाकोला`तील अनधिकृत घरं रिकामी होतायत...

Last Updated: Thursday, June 5, 2014, 11:31

सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी आपली घरं रिकामी करायला सुरूवात केलीय.

स्पाइसचा सर्वात स्वस्त डुअल सिम क्वार्टी फोन

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 21:35

स्पाइस मोबाइलने सर्वात स्वस्त क्वार्टी फोन सादर केला आहे. जो 1.3 Ghz डुअल कोर प्रॉसेसरवर चालतो. त्याचे नाव आहे स्टेलर 360 आणि हा अँड्रॉइड फोन आहे.

पहिल्याच दिवशी लोकसभा अधिवेशन स्थगित

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 11:07

सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु, आज सभागृहात कोणतंही कामकाज होणार नाही.

बॉलिवूड कलाकारांनी वाहिली मुंडेंना ट्विटरवरून श्रद्धांजली

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 16:17

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं आज सकाळी कार अपघातानंतर निधन झालं. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलाय. बॉलिवूडमधूनही मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. अनेक कलाकारांनी ट्विट करून मुंडेंना आदरांजली वाहिली.

मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्याला अटक, जामीनावर सुटका

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 18:09

केंद्रीय ग्रामविकास मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या कार चालकाला अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:56

भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

पंतप्रधान मोदी यांची गोपीनाथ मुंडेना श्रध्दांजली

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 10:08

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुंडे यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रध्दांजली वाहीली. मुंडेच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झालेय, असं मोदींनी ट्विटरद्वारे श्रध्दांजली वाहली.

नाथ्रा ते नवी दिल्ली... मुंडेंचा प्रवास

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:43

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... एक नजर टाकुयात त्यांच्या कारकिर्दिवर...

महाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:57

भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.

गुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:22

मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.

गुलबर्गाजवळ अपघात, महाराष्ट्रातील १६ भाविक ठार

Last Updated: Monday, June 2, 2014, 17:18

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय , अक्कलकोटहून कर्नाटकातील गुलबर्गाकडे जाणाऱ्या मिनी टेम्पोला कर्नाटक महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला तर तब्बल १३ जखमी झालेत.

रितेशने जेलेनियाचा स्कर्ट मागितला उधार

Last Updated: Monday, June 2, 2014, 17:02

साजिद खानचा आगामी चित्रपट ‘हमशकल्स’ मध्ये रितेश देशमुखने पुन्हा एकदा मुलीच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. रितेशने एका गाण्यात स्कर्ट घातला आहे, विशेष म्हणजे रितेशने हा स्कर्ट आपली पत्नी जेलेनिया डिसुजाकडून उधार घेतला होता.

पंजाबचा पराभव...कोलकाता आयपीएल विजेता

Last Updated: Sunday, June 1, 2014, 23:33

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

व्हिडिओ : `बॉबी जासूस`ची भन्नाट 12 रुपं!

Last Updated: Friday, May 30, 2014, 20:52

विद्या बालनचा आणखी एक ड्रिम प्रोजेक्ट येतोय. यात विद्या बनलीय ‘बॉबी जासूस’... यात विद्या एक नाही, दोन नाही तर तब्बल 12 वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. फिल्मचा फर्स्ट लूक नुकताच रिव्हिल करण्यात आलाय.

`पेड न्यूज` भोवली; चव्हाणांची खासदारकी रद्द होणार?

Last Updated: Friday, May 30, 2014, 19:16

‘पेड न्यूज’ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्यावर आरोप निश्चित झालेत.

`कॅम्पा कोला`वर पुन्हा होणार सुनावणी... रहिवाशांना दिलासा!

Last Updated: Friday, May 30, 2014, 16:36

मुंबईतल्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना शेवटच्या टप्यात सुप्रीम कोर्टानं किंचित दिलासा दिलाय.

अमित शहा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?

Last Updated: Thursday, May 29, 2014, 13:22

मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये राजनाथ सिंह यांना गृहमंत्री बनविल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चाचपणी भाजपने सुरू केली आहे

वर्ध्यात खाजगी बसला आग, 5 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Last Updated: Thursday, May 29, 2014, 17:12

जळगावहून नागपूरला येणाऱ्या बाबा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळ अचानक आग लागली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:05

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स X किंग्ज इलेव्हन पंजाब

खोट्या प्रतिष्ठेखातर गर्भवती महिलेची दगडानं ठेचून हत्या!

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 15:56

पाकिस्तानात एका २५ वर्षीय गर्भवती महिलेची हायकोर्टाच्या बाहेरच दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय... आणि ही निर्घृण हत्या केलीय या महिलेच्या पित्यानं आणि तिच्या भावांनी...

आमदारावर नगरसेविकेच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:22

डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहरण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र; भाजपचा जोर

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 18:21

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.

शरीफ यांना राष्ट्रगीतासाठी उभे राहावे लागले

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 12:57

भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच सर्वांबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उभे राहिले. भारताच्या राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहावे लागू नये म्हणून त्या-त्या कार्यक्रमाच्या वेळी अनुपस्थित राहणे किंवा उशिरा येण्याचा मार्ग अवलंबणार्यान शरीफ यांना यावेळी मात्र उभे राहावे लागले.

गोरख धाम एक्स्प्रेसला अपघात, 10 ठार

Last Updated: Monday, May 26, 2014, 14:22

गोरखपूर एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळ अपघात झाला आहे. या अपघातात 10 जण ठार झाले आहेत.

... आणि तिनं जीवन संपवलं!

Last Updated: Sunday, May 25, 2014, 22:18

आजच्या तरुणांमध्ये नैराश्य खूप येतं का? हा प्रश्न वारंवार घडणाऱ्या काही घटनांवरुन समोर येतोय. गोदावरी मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीनं मैत्रिणींच्य़ा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

नड्डा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?

Last Updated: Sunday, May 25, 2014, 11:02

भाजपसाठी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु झालाय. मोदींच्या कॅबिनेटमध्ये विद्यमान भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

भोस्ते घाटात बस दरीत कोसळली; 30 जखमी

Last Updated: Sunday, May 25, 2014, 10:08

कणकवली-मुंबई रातराणी एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.

ओबामा जेव्हा रस्त्यावर फिरतात तेव्हा...

Last Updated: Friday, May 23, 2014, 17:02

जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा रस्त्यावर फिरतात... मॉलमध्ये जातात.... लोकांच्या गाठी भेटी घेतात. हे सांगितल्यावर तुम्हांला खोटं वाटेल... पण हे खरं आहे. हा व्हिडिओ पाहा त्यात ओबामा चक्क रस्त्यावर फिरताना आणि आपल्या जनतेशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

राज ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा

Last Updated: Thursday, May 22, 2014, 18:15

भारतीय जनता पक्षाने जसे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव घोषित केले, त्याच प्रमाणे राज ठाकरे नाव राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषीत करा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज येथे केली.

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

Last Updated: Friday, May 23, 2014, 20:53

कोलकाता नाईट रायडर Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

व्हिडिओ : `तेरी गलियाँ`... श्रद्धा-सिद्धार्थची हॉट केमिस्ट्री!

Last Updated: Thursday, May 22, 2014, 08:50

`स्टुडंट ऑफ द इअर`फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि `आशिकी-2` गर्ल श्रद्धा कपूरची हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आगामी `एक विलन` या चित्रपटातून... या चित्रपटातील `तेरी गलियाँ` हा साऊंड ट्रॅक नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.

याकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!

Last Updated: Thursday, May 22, 2014, 08:23

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.

मुंबईत जागा वाढवा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 18:18

विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत जास्त जागांची मागणी भाजपनं केली आहे. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले.

11 किलो सोन्याची चोरी, चौकशीनंतर शिपायाची आत्महत्या

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 15:15

दिल्लीत सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये 11 किलो सोने चोरी करण्यात आली. या चोरीची चौकशीनंतर शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शाहिदला बनायचंय श्रद्धाचा `बेस्ट फ्रेंड`!

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 13:03

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरला सध्या ‘सिंगल’ या शब्दाचा फारच कंटाळा आलेला दिसतोय... म्हणूनच की काय ‘सिंगल... हू इज रेडी टू मिंगल’ असं म्हणणारा शाहिदचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलेलं दिसलं. पण, प्रत्येक वेळेस गाडी काही पुढे सरकली नाही.

`त्या दिवशी सलमान दारु प्यायलेला नव्हता`

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 08:52

‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणात आणखी एका साक्षीदारानं दिलेल्या साक्षीमुळे अभिनेता सलमान खान याला दिलासा मिळालाय. घटनेच्या दिवशी सलमान नशेत नव्हता, अशी साक्ष सलमान खानच्या एका शेजाऱ्यानं दिलीय.

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs चेन्नई सुपर किंग्ज

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:26

कोलकाता नाईट रायडर्स Vs चेन्नई सुपर किंग्ज IPL 2014 Live Score: Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings

पॅनसॉनिक P81 बाजारात लाँच

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:20

जपानची कंपनी पॅनसॉनिकने आपला नवीन डुअल सिम हँडसेट P81 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा प्रचार गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर करत आहे. नवीन फिचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रूपयांपेक्षा ही कमी आहे. तसेच स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रूपये इतकी आहे.

स्कोअरकार्ड : सनरायझर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:34

सनरायझर्स हैदराबाद Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

`झी 24 तास`ची मोहीम : गंगाजल... माय प्राईड

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:23

गंगा... आपल्यासाठी ही केवळ एक नदी नाही... तर गंगा ही आपली सभ्यता आहे, संस्कृती आहे... गंगा आणि आपल्या संस्काराचं अतूट नातं जोडलं गेलंय.

मोदींचा सत्ता स्थापनेचा दावा, 26 मे रोजी शपथ

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:03

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीत नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.

बस दरीत कोसळली; 17 जण ठार

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 11:14

जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागात मंगळवारी सकाळी एक प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या भीषण दूर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी अवस्थेत आहेत.

राष्ट्रपतींना भेटून मोदी करणार सत्ता स्थापनेचा दावा

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 10:48

केंद्रात लवकरच मोदी सरकारची स्थापना होणार आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

लोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 09:26

मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.

सात करोड घेऊन करिश्मा सोडणार मुलांचा ताबा?

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 08:29

अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय.

डर्टी गर्ल विद्या होतेय जासूस

Last Updated: Monday, May 19, 2014, 21:09

बॉलीवूड डर्टी गर्ल विद्या बालन तिचा आगामी चित्रपट `बॉबी जासूस`साठी खूप मेहनत घेत आहे. `बॉबी जासूस`मध्ये विद्या गुप्तहेरच्या भूमिकेत दिसणार आहे.

`पप्पा, माझी गर्लफ्रेंड प्रेग्नेंट झाली`

Last Updated: Monday, May 19, 2014, 16:30

दिल्लीच्या एका मुलाने आपल्या वडिलांची मस्करी करण्याचा प्लॅन केला. त्याने आपल्या खोलीत एक कॅमेरा लावला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. जसे त्याचे वडील खोलीत आले, त्याने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे.

कोलकताने हैदराबादला नमवले

Last Updated: Sunday, May 18, 2014, 23:53

सनराईजर्स हैदराबाद Vs कोलकता नाईट रायडर्स